ग्रीक रोमन मुला – मुलींची सोमवारी कुस्ती स्पर्धा

वरणगांव

फ्री स्टाईल ग्रीक रोमन राज्य कुस्तिगीर संघाच्या आदेशान्वये विविध गटातील ग्रीक रोमन फ्री स्टाईल भुसावळ तालुका कुस्ती स्पर्धेची निवड चाचणी स्पर्धा सोमवार दि .१६ सप्टेंबर रोजी वरणगांव येथिल श्री हनुमान व्यायाम शाळे मध्ये होणार आहेत यासाठी कुस्तीप्रेमी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

सदरील कुस्ती स्पर्धा १५ / १७ / व २० वर्षाखालील वयोगटामधे व ग्रीक रोमन कुस्ती नियमाप्रमाणे विविध वजन गटात घेण्यात येणार असुन त्यासाठी वयाच्या पुराव्याचे मेडीकल प्रमाणपत्र व पालकाचे संमतीपत्र आवश्यक असेल . या स्पर्धांसाठी वजन घेणे ९ वाजेपासुन सुरु होईल . तसेच दहा वाजता प्रत्यक्ष कुस्त्यांना सुरुवात होईल . यासाठी भुसावळ तालुक्यातील मुली व मुले पैलवानांनी वेळेच्या आत उपस्थित राहावे असे आवाहन भुसावळ तालुका कुस्तीगीर संघातर्फे करण्यात आले आहे . कुस्ती स्पर्धेसाठी येतांना वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड किंवा जन्म दाखला आणणे आवश्यक आहे . वजनामधे कुठलीच तफावत चालणार नाही तंतोतंत व योग्य वजन गट असेल त्यांनाच जिल्हा कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेता येईल याची सर्व पैलवानांनी नोंद घ्यावी .असे आवाहन भुसावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष नामदेव पहेलवान , उपाध्यक्ष सुपडु पहेलवान . प्रशांत पहेलवान , जमील पहेलवान ‘ एकनाथ पहेलवान , संजय पहेलवान ‘ बाळासाहेब चव्हाण व भुसावळ तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांनी केले आहे .