उधना ते पुरी दरम्यान साप्ताहिक उत्सव विशेष गाडी :

रेल्वेने आगामी सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी मागणी लक्षात घेता तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दिवाळी आणि छट या सणांमध्ये उत्सव विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेतः

उधना ते पुरी साप्ताहिक उत्सव विशेष गाडी (२२ फेरी)

गाडी क्रमांक ०८४७२: दिनांक १७.०९.२०२४ ते २६.११.२०२४ पर्यंत प्रत्येक मंगळवार रोजी १७.०० वाजता उधना येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२.४५ वाजता पुरी येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०८४७१: दिनांक १६.०९.२०२४ ते २५.११.२०२४ पर्यंत प्रत्येक सोमवार रोजी ०६.३० वाजता पुरी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १४.०० वाजता उधना येथे पोहोचेल.

थांबे -: चलठाण, व्यारा, नंदूरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा , संबलपूर सिटी, रायकाखोल, अंगुल, तालचेर रोड, धेनकनाल, भुवनेश्वर आणि खुर्दा रोड स्टेशन्स दोन्ही दिशेने.

संरचनाः ०१ एसी २-टीयर, ०३ एसी ३-टीयर, १० स्लीपर क्लास आणि ४ जनरल सेकंड क्लास कोचेस, २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह (२० डब्बे).

आरक्षण: उत्सव विशेष ट्रेन क्रमांक ०८४७२ च्या सेवांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि ०८.०९.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रवाशांना या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.