पाल येथे देवगिरी प्रांत कल्याण आश्रम भुसावळतर्फे रक्षाबंधन उत्साहात ;


भुसावळ – पाल ता. रावेर येथे देवगिरी प्रांत कल्याण आश्रम भुसावळतर्फे रक्षाबंधनचा कार्यक्रम उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला .
यावेळी परिसरातील गाडऱ्या , जामण्या ,उसमळी, निमड्या , गारखेडा , गारबर्डी , न्हावी ,धुपा , पिपंरकुंड ,गावर्डी येथील जनजाती बांधव व पाल येथील सातपुडा शिक्षण प्रसारक संचलित लिलाबाई नामदेव पाटील आश्रमशाळे चे शालेय विदयार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते . एकमेकांना राखी बांधून शुभेच्छा देत आरोग्यासह देव देश व धर्माचे रक्षण करण्याची ग्वाही दिली
यावेळी देवगिरी प्रांत कल्याण आश्रमचे जिल्हाध्यक्ष डॉ निलेश भिरुड , जिल्हा उपाध्यक्ष डॉ किशोर मोरे , देवगिरी कल्याण आश्रम कार्यकर्ते अँड चित्रा आचार्य, अँड जास्वंदी भंडारी ,अँड जयश्री देशमुख ,पत्रकार उज्वला बागुल , स्वाती भोळे , , विरसिंग वसावे , दिनेश बारेला , यांचेसह मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिनेश बारेला, विरसिंग वसावे व देवगिरी प्रांत कल्याण आश्रम भुसावळच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले .