अंतर्नाद’तर्फे गणेशोत्सवात एक दुर्वा समर्पणाची उपक्रम ; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार ; यंदा उपक्रमाचे ८ वे वर्ष.

भुसावळ

भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशाेत्सवाचे औचित्य साधून ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम गणेशोत्सव काळात राबवण्यात येणार आहे. गणेशाेत्सवाच्या खर्चात बचत करून वंचित, गरजू आणि गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करायचे, असा हा उपक्रम आहे.यंदा उपक्रमाचे आठवे वर्ष आहे.

गणेशाेत्सवात वारेमाप हाेणाऱ्या खर्चात बचत करण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी केले जाते. गणरायाला दुर्वा म्हणून शैक्षणिक साहित्य अर्पण करून ते गाेरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करायचे, असा हा साधा आणि साेपा उपक्रम आहे. यंदा या उपक्रमाचे आठवे वर्ष आहे. गेल्या सात वर्षांत तब्बल २९ शाळांमध्ये किमान २५३० गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे.भुसावळ, बोदवड, जामनेर, यावल आणि रावेर तालुक्यातील शाळा निवडून हे साहित्य वाटप करण्यात आले. यंदाही ग्रामीण व शहरी भागातील पाच शाळांची निवड करून त्या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.त्यात पाटी, पेन्शील, वह्या, पेन, कंपासपेटी, गणवेश, पुस्तक या साहित्याचा समावेश असेल. अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी या उपक्रमाची मुहूर्तमेढ राेवली आहे. ज्या दात्यांना शक्य असेल त्यांनी उपक्रमात सहभागी होऊन शालेय साहित्य मदत म्हणून संस्थेस देण्याचे आवाहन प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले, प्रकल्प समन्वयक अमितकुमार पाटील, प्रकल्प सह समन्वयक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

उपक्रमासाठी योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, जीवन महाजन, संजय भटकर, प्रसन्ना बोरोले, विक्रांत चौधरी, कुंदन वायकोळे, हितेंद्र नेमाडे, समाधान जाधव, अमित चौधरी, ललित महाजन, राजू वारके, भूषण झोपे, देव सरकटे, प्रा.शामकुमार दुसाने, शैलेंद्र महाजन, राहुल भारंबे, तेजेंद्र महाजन, उमेश फिरके, विपीन वारके, हरीश भट, जीवन सपकाळे, सचिन पाटील, निवृत्ती पाटील, प्रमोद पाटील , राजेंद्र जावळे, मंगेश भावे, अध्यक्ष संदीप पाटील परिश्रम घेत आहेत.