रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-सुभेदारगंज आणि कानपूर विशेष ट्रेन सेवा ४० अतिरिक्त सेवांसाठी वाढवली आहे रेल्वेने विशेष गाड्यांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पुढील विशेष गाड्यांच्या सेवा ४० अतिरिक्त सेवांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे:

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-सुभेदारगंज साप्ताहिक विशेष (२० सेवा)
04116 लोकमान्य टिळक टर्मिनस – सुभेदारगंज साप्ताहिक विशेष दि. २७.०९.२०२४ ते दि. २९.११.२०२४ पर्यंत दर शुक्रवारी चालविण्यासाठी मुदतवाढ (१० सेवा) केली आहे.
04115 सुभेदारगंज-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष दि. २६.०९.२०२४ ते दि. २८.११.२०२४ पर्यंत दर गुरुवारी चालविण्यासाठी मुदतवाढ (१० सेवा) केली आहे.
संरचना: ६ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे)
या ट्रेनचे चालण्याचे दिवस, वेळ, संरचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- कानपूर साप्ताहिक विशेष (२० सेवा)
04152 लोकमान्य टिळक टर्मिनस -कानपूर साप्ताहिक विशेष दि. २८.०९.२०२४ ते दि. ३०.११.२०२४ पर्यंत दर शनिवारी चालविण्यासाठी मुदतवाढ (१० सेवा) केली आहे.
04151 कानपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष दि. २७.०९.२०२४ ते दि. २९.११.२०२४ पर्यंत दर शुक्रवारी चालवण्यासाठी मुदतवाढ (१० सेवा) केली आहे.
या ट्रेनचे चालण्याचे दिवस, वेळ, संरचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 04116 आणि 04152 च्या विस्तारित सेवांसाठी बुकिंग दि. ०२.०९.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्वथळावर सुरू होईल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


