भुसावळ – येथील अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तर्फे आयोजित प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर नुकतेच श्री व्यंकटेश बालाजी मंदिर हॉल येथे एकदिवसीय शिबीर उत्साहात साजरे करण्यात आले .
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भुसावळ
येथे अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तर्फे प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले,
याप्रसंगी मानवतकर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.राजेश मानवतकर ,गोल्डन अव्हर हॉस्पिटलचे संचालक डॉ. संतनू कुमार साहू ,आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जळगाव विभागाचे प्रमुख नरवीर सिंग रावळ ,अर्पण हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.सुवर्णा गाडेकर आणि वन्यजीव संरक्षण संस्था जळगावचे सतीश कांबळे , आणि तालुका वैद्यकीय कार्यालयाचे प्रतिनिधी नरेंद्र तायडे ,आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ.वंदना वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सत्रात यशस्वीपणे पार पडले ,
यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले,
यावेळी आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष .उमेंद्र वाकचौरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले गेल्या पाच वर्षापासून यशस्वीरित्या जळगाव जिल्ह्यामध्ये प्रथमोपचार शिबिराचे आयोजन करीत आहोत,
प्रथमोपचार म्हणजे आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णास प्राथमिक उपचार करून त्याचा जीव वाचवणे , रुग्णास वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत प्राथमिक उपचार करून त्यांचे जीव वाचवणे ,हे अत्यंत महत्त्वाचे आहे,आणि समाजासाठी अशा प्रकारच्या शिबीरांची आवश्यकता असल्याचे सांगितले
त्यांनतर प्रथम सत्रात डॉ संतनू कुमार साहू यांनी सीपीआर (CPR)चे प्रात्यक्षिक करून उत्कृष्ट सादरीकरण केले, व सीपीआर(CPR) बद्दल अत्यंत उपयुक्त अशी माहिती मांडुन उपस्थितांची मने जिंकून घेतले,
यानंतर .नरेंद्र तायडे यांनी प्रथमोपचार शिबिर समाजासाठी किती उपयुक्त आहे आणि प्रथमोपचार म्हणजे काय ? कशा प्रकारे करावे, याची प्रत्यक्षिकासह माहिती दिली,
द्वितीय सत्रात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नरवीर सिंग रावळ यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले , डॉ. राजेश मानवतकर यांनी प्रथमोपचारासह वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे ,आणि त्यासाठी पॅरामेडिकलचे विद्यार्थी तयार होणे, हे वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत आवश्यक आहे,
हे आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना समजून सांगितले,
त्यानंतर डॉ. सुवर्णा गाडेकर यांनी वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी करिअर करायचे असेल तर सर्वांनी “डॉक्टर” व्हावे असेच आवश्यक नाहीये तुम्ही पॅरामेडिकल क्षेत्रात ही यशस्वीपणे आपले करिअर करू शकता हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले,
या अतिशय सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री देशमुख तसेच समाधान जाधव सर यांनी केले तर
अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती रजनी बडगुजर यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले,
या अत्यंत उत्कृष्ट अशा शिबिराचे यशस्वीतेसाठी परवेझ खान, सागर तायडे,अशोक बाविस्कर
समीर शेख, रीना पारधी, गोपाल कंकर, गिरीश पाटील, लक्ष्मीपती नायक गिरीश कोळी,विनित दवंगे आणि संपूर्ण टीम अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांनी प्रयत्न केले.



