जळगाव – पोलीस हे जनतेचे रक्षक असतात.. जनता पोलिसांना आदर्श मानते आणि हेच पोलीस जर भरदिवसा हॉटेल समोर दारू पिऊन धिंगाणा घालत असतील तर खाकी डागाळणारच …खाकी वर्दीची इज्जत जाणारच.. अशीच एक धक्कादायक जळगाव शहरातून समोर आलीय.

जळगाव शहरात २५ ऑगस्ट रोजी भरदिवसा बारमध्ये गणवेशातच बसून मद्यप्राशन करून झिंग झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर दोघं पोलिसांमध्ये हाणामारी झाली. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांच्या हाणामारीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली ते पोलीस जळगावात बंदोबस्तासाठी आल्याची माहिती मिळाली. ते जळगाव जिल्ह्यातीलच असल्याचे सांगण्यात येत आहे.
बारमध्ये फोडले ग्लास
रविवारी दुपारी भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये पोलिसांनी मद्यपान केले. हे पोलीस बारमध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी दोन ग्लासही त्यांनी फोडले. त्यानंतर संध्याकाळी साडेपाच ते पावणे सहावाजेदरम्यान बाहेर आल्यानंतर त्यांच्यात आपसात वाद झाले. बराच वेळ त्यांच्यात बाचाबाची सुरू होती. हा वाद वाढतच जाऊन तिघे जण एकमेकांना भिडले व त्यात एक जण तर चिखलातही पडला.
तसेच पोलिसांच्या गाडीत चालक असलेला पोलीस कार काढताना दोन दुचाकींना धक्का दिला. त्यामुळे त्या दुचाकी पाडल्या. त्यानंतर काही अंतरावर जाऊन एका सायकलस्वार मुलाला धडक देत पसार झाल्याची घटना यावेळी घडली. सुदैवाने यात मुलाला मोठी दुखापत झाली नाही.


