भुसावळ – येथील महिला क्रिडा मंडळ व रोटरी क्लब ऑफ भुसावळ तर्फे दरवर्षी राज्य स्तरावरीय बुध्दीबळ स्पर्धां घेण्यात येत असून यंदा स्पर्धेचे चवथे वर्ष होते . यावर्षी असलेल्या अतिवृष्टीतसुद्धा राज्यातून जवळपास १४० स्पर्धकांनी सहभाग नोंदवल्याने भर पावसात सुध्दा या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
अकोला,जामनेर,शहादा, धुळे, पाचोरा चाळीसगाव, बुलढाणा,जळगाव नाशिक, येथून १४० स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धकांची नाव नोंदणी सौ. प्रिता पिंगळे यांनी केली स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे ६५ वर्षे वयाचे संजय चापोरकर सर्वात जेष्ठ तर सर्वात लहान ६ वर्षे वयाची ज्ञानवी यांनी स्पर्धेत भाग घेतला होता
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेपाळ बस दुर्घटनेमधील सर्व मृतांना व कलकत्ता बलात्काराला बळी पडलेल्या महिला डॉक्टर यांना सौ. मंगला पाटील यांच्यासह उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली.
स्पर्धेचे उद्घाटन मागच्या वर्षीचे विजेते व डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. नारायण आर्वीकर यांनी व ६ वर्षे वयाची ज्ञानवी पाटील यांनी पटावरील सोंगट्या हलवून केले.
स्पर्धा सुरू झाल्या. एकुण आठ राउंड करण्यात आले.
त्या नंतर बक्षिस समारंभाला सुरवात झाली. एकुण २७ बक्षिसे होती. रोख रक्कम, ट्राॅफी व सर्टिफिकेट असे बक्षिसाचे स्वरूप होते.
सुत्रसंचलन स्वाती नाईक यांनी केले
बक्षिसे जाहीर जयश्री ओक यांनी केले स्वागत गीत भारती चव्हाण व वैशाली पाटील यांनी स्वागत गीत सादर केले.
बुध्दीबळाचे आँर्बीट्रेटर म्हणून जळगावचे भरत आमले व प्रवीण ठाकरे यांनी काम बघितले.
४५ मिनिटाचा एक राउंड असे ८ राउंड घेण्यात आले.
बक्षिस समारंभासाठी रोटरीचे अध्यक्ष अनंत पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी अंतरराष्ट्रीय कीकबाँक्सर खेमचंद्र पाटील, सह मान्यवर मंचावर उपस्थित होते.

स्पर्धेत विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे ——–सात वर्षा खालील गटात … प्रथम .. शिवांश भाला , द्वितीय… गुरुमुख जाधवानी
तृतीय… ज्ञानवी भारंबे
९ वर्षा खालील गटात —
प्रथम.. ओजस तनवरीवार , द्वितीय.. आर्यन अग्रवाल
तृतीय…. रूजूल सरोदे तर
१२ वर्षा खालील गटात प्रथम.. निकुंज भाला , द्वितीय.. हिमांशू सरोदे , तृतीय… निर्भयकुमार दौड
१५ वर्षा खालील गटात ..प्रथम… इशान पाटील , द्वितीय.. अंकिता निकम , तृतीय…. हर्ष जाधव आणि
६० वर्षे वयाचे पुढील गृप मध्ये
प्रथम.. नथू सोमवंशी , द्वितीय ओपन ग्रुप..
१)तासिन रफिक तडवी )अनिकेत शिरोडे , पद्माकर करनकर
निशांत शिंदे , किशोर रील , कौशल अकोले , विहान वाघुळदे
विनय हेडा , गौरव बोरसे , तिलक सरोदे
अरबाज शेख यांनी यावर्षी सुद्धा भुसावळ किंग चा मान पटकावला तर भुसावळ क्विन म्हणून मोहीनी नागरूत ,यांनी विजय मिळवला .
महिला क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी हयांनी प्रस्तावीक केले.त्यात त्यांनी सांगितले की सामुपदेशीका असल्याने मुलांच्या मोबाईलच्या अतिवापरामुळे पालकांच्या तक्रारी येतात. मुलाची एकाग्रता व विचारक्षमता, संयम कमी झालेला आहे हे जाणवते आहे. त्यावर उपाय म्हणून बुध्दीबळ हा अतिशय चांगला उपाय आहे. त्यामुळे आम्ही या स्पर्धां दर वर्षी सातत्याने ४ वर्षे पासून घेत आहोत.
प्रो. चेअरमन चारू महाजन यांनी मुलांना खेळा विषयी मार्गदर्शन केले. तर मंगला पाटील यांनी स्पर्धकांना प्रत्येक राउंडचे स्कोअर जाहीर केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विकास कोळंबे. माधुरी गुजर, डॉ. वंदना वाघचौरे, राजश्री कोलते डॉ. भाग्यश्री भंगाळे, राखी भराडे, सोना काबरा, अलका ढाके, प्रकाश विसपुते, डॉ. नि. तू. पाटील, जावळे, बोबडे, आर. एल. पाटील हजर होते.
या वेळी रोटरीचे राजेश अग्रवाल, महेश भराडे, सारंग चौधरी, संजय चापोरकर, गोपाल तिवारी, सारंग चौधरी, हेमंत नाईक,सतीश झांबरे, तर महिला क्रिडा मंडळाच्या प्राची राणे, प्रभा पाटील, अनिता कवडीवाले, स्वाती भोळे, साधना सराफ, सुनिता पाचपांडे, विनीता नेवे, अनिता सपकाळे, संगीता पाटील,विजया निकम, माधुरी गव्हाळे , किरण चौधरी उपस्थित होते.


