भुसावळ (प्रतिनिधी )-
संपूर्ण जगात दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कायदा 1897 चे आदेश जिल्हाधिकारी यांनी आज दिले . आदेशात नमूद आहे की कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू झालेला असून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील अत्यावश्यकसेवा जसे किराणा सामान दूध व भाजीपाला अन्यजीवनावश्यक वस्तु व औषधालय म्हणजेच मेडिकलचे दुकान सोडून बाकी सर्व दुकाने , शोरूम , एजन्सी यांनी 31 मार्च 2020 पर्यन्त आपली दुकाने बंद ठेवावी तसेच शहरातील सर्व खाजगी अभ्यासीका , क्लासेस , ट्यूशन्स पुढील आदेश होई पावेतो बंद ठेवावीत तसेच या आदेशाचे पालन कोणत्याही व्यक्तिने न केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता 1860(45 ) च्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानून त्याचेविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी ड़ॉ. अविनाश ढाकणे यांनी आज सोमवार 16 मार्च 2020 रोजी दिले आहेत .



