जागतिक ग्राहक दिनानिमित्त अ.भा.ग्राहक पंचायत एरंडोल तालुका बैठक संपन्न

एरंडोल (प्रतिनिधी )-
एरंडोल तालुका ग्राहक पंचायतीची बैठक रविवारी दि. १५ मार्च रोजी तालुका अध्यक्ष आरती ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे १९६० मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहक चळवळीचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केलं आणि याबाबत जागतिक स्तरावर पाठपुरावाही करण्यात आला. त्याला युनेस्कोकडूनही मान्यता मिळाली. त्यानुसार दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळला जातो अशी माहिती सदस्य कुंदन सिंह ठाकुर यांनी दिली.
यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष विकास महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकीला एरंडोल तालुका ग्राहक पंचायत सदस्य ,पत्रकार कुंदनसिंह ठाकुर, सचिव डॉ प्रंशात , रोहिदास पाटील,सेवा निवृत्त नायब तहसिलदार विलास मोरे, सौ. नीलिमा मानुधने,सौ इंदिरा साळी,सौ सुशिला सोनार, सौ मालती पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सूत्र संचालन तालुका अध्यक्षा सौ.आरती ठाकूर यांनी केले तर आभार डॉ प्रंशात पाटील पाटील यांनी आभार व्यक्त केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *