भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळातून अल्पवयींन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपी युवकास व मुलीस बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा येथून १४ मार्च शुक्रवार रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेवून भुसावळ येथे पोलीस ठाण्यात आणून आरोपी मंगेश काळे विरुद्ध पोस्को कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशन येथे गुरन 0078/2020 भादवी कलम 363 प्रमाणे दि.04/03/2020 रोजी.गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगी वय 17 वर्षे 01महिना रा.हनुमान नगर भुसावळ हि दि.2 मार्च 2020 रोजी सकाळी 10 वाजता तिच्या राहत्या घरुन तिच्या आईस सांगुन गेली की मी नाहाटा काॅलेजला जाते असे सांगुन घरुन गेली ती घरी न आल्याने तीच्या आई व नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता ती कुठेही सापडली नाही म्हणून मुलीची आई यांनी पो.स्टे.ला फिर्याद दिल्या वरुन गुन्हा दाखल करण्यात आला .
दरम्यान पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या मोबाईल सी.डी.आर. लोकेशन वरुन पथक तयार केले हे पथक बुलढाणा जिल्ह्यातील साखर खेडाकडे रवाना झाले साखरखेडा येथे जावुन १४ मार्च शनिवार रोजी अल्पवयीन मुलगी व आरोपी मंगेश अंबादास काळे वय 22 रा.कृष्णा नगर भुसावळ यांना ताब्यात घेवुन भुसावळ पोलीस स्टेशनला आणले व पुढील तपासावरुन गुन्ह्यात पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे , आरोपी विरुध्द याआधी सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डाॅ.पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौज तस्लिम पठाण,पो.हे.काॅ जयराम खोडपे, पो.ना.चंद्रकांत बोदडे, दिपक जाधव, म.पो.काॅ.संगिता चौधरी यांनी केली.



