भुसावळ- दिपनगर येथील भुसावळ औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील २१० मेगावॅट प्रकल्पात हाइड्रोजन विभागात कार्यरत एका कंत्राटी कामगाराने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दि.१५ मार्च रविवार रोजी रात्री १०-३० वाजे दरम्यान उघडकिस आली . ड्यूटीवर असतांनाच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने प्रकल्पात एकच खळबळ उडाली आहे .
सॅनड्राज कंपनीतील कामगार व कंडारी येथील रहिवासी, कंत्राटी कामगार भरत तायडे (वय ४५ ) याने ड्यूटीवर असतांना रविवार दि.१५ रोजी दुपारी २ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्र पाळी करीता आलेल्या दुसऱ्या कामगारास दिसल्याने त्याने त्वरीत ही बाब सुरक्षा व्यवस्थापक यांना कळविली . या कंत्राटी कामगाराने ऑनड्यूटी
आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजले नाही .दरम्यान घटनास्थळी त्वरित अधिकारी व तालुका पोलिसांनी धाव घेवून पाहणी केली .याबाबत तालुका पोलिस ठाण्यात उशीराने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.



