लखनऊ मंडळात ब्लॉकमुळे ४ गाड्या रद्द, सहांच्या मार्गात बदल तर दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट

भुसावळ ( प्रतिनिधी )-
रेल्वेच्या लखनऊ मंडळात प्रयागराज फाफामौ दरम्यान डबल रेल्वे लाईन व नॉन इंटरलॉकिंग कार्य करण्यात येणार असल्याने भुसावळ रेल्वे मंडळातून जाणार्‍या चार गाड्या रद्द, सहा गाड्यांच्या मार्गात बदल तर दोन गाड्यांना शॉर्ट टर्मिनेट करण्यात आले आहे.
रद्द गाड्या – गाडी क्र.१२१६५ डाऊन लोटिट-मंडुआदिह एक्सप्रेस ही दि. २६, २७, ३० मार्च तसेच दि. २, ३ व ६ एप्रिल रोजी रद्द राहणार आहे. गाडी क्र. १२१६६ अप मंडुआदिह-लोटिट एक्सप्रेस हि दि.२७, २८, ३१ मार्च तसेच दि.३, ४ व ७ एप्रिल रोजी रद्द राहणार आहे. गाडी क्र. १५०१७ डाऊन लोटिट- गोरखपूर काशि एक्सप्रेस ही दि. २२, २६ मार्च ते दि.९ एप्रिल २०२० पर्यंत रद्द राहील.तसेच गाडी क्र. १५०१८ अप गोरखपूर-लोटिट काशि एक्सप्रेस ही दि. २० व २४ मार्च ते दि. ७ एप्रिल २०२० पर्यंत रद्द राहिल.
मार्गात बदल गाड्या – गाडी क्र. २२१०३ डाऊन लोटिट – फैजाबाद एक्सप्रेस ही दि. २३, ३० मार्च व दि. ६ एप्रिल रोजी आपल्या निर्धारित मार्गाने न जाता मनिकपूर, कानपूर, लखनऊ मार्गे फैजाबाद येथे जाईल. गाडी क्र. २२१०४ फैजाबाद – लोटिट एक्सप्रेस ही दि.२४ व ३१ मार्च रोजी आपल्या निर्धारित मार्गाने न जाता लखनऊ, कानपूर, मनिकपूर मार्गे लोटिट येथे जाईल. गाडी क्र. १५०५५ डाऊन लोटिट-गोरखपूर गोदान एक्सप्रेस ही दि. १९ मार्च ते दि. ६ एप्रिलपर्यंत आपल्या निर्धारित मार्गाने न जाता वाराणसी जाफराबाद, शाहगंज मार्गे गोरखपूर येथे जाईल. गाडी क्र. ११०५६ अप गोरखपूर-लोटिट गोदान एक्सप्रेस ही दि.२० मार्च ते दि. ७ एप्रिल २०२० पर्यंत आपल्या निर्धारित मार्गाने न जाता शाहगंज, जाफ़राबाद, वाराणसी मार्गे लोटिट येथे जाईल. गाडी क्र. ११०५९ डाऊन लोटिट छपरा एक्सप्रेस ही दि. १९ मार्च ते दि. ६ एप्रिल २०२० दरम्यान आपल्या निर्धारित मार्गाने न जाता वाराणसी, जाङ्गराबाद, शाहगंज मार्गे छपरा जाईल. गाडी क्र. ११०६० अप छपरा- लोटिट एक्सप्रेस ही दि. २० मार्च ते दि७ एप्रिल २०२० पर्यंत आपल्या निर्धारित मार्गाने न जाता शाहगंज, जाङ्गरबाद, वाराणसी मार्गे लोटिट येथे जाईल.
शॉर्ट टर्मिनेट गाड्या – गाडी क्र. ११०७१ डाऊन लोटिट-वाराणसी कामायनी एक्सप्रेस ही प्रयागराज येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. गाडी क्र. ११०७२ अप वाराणसी -लोटिट कामायनी एक्सप्रेस ही वाराणसी येथून न निघता प्रयागराज येथून सुटणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *