भुसावळ – येथील जय गणेश फाउंडेशनची बैठक सुरभी नगरातील नवसाचा गणपती मंदिरात नुकतीच झाली. त्यात नूतन अध्यक्षपदी राजेंद्र यावलकर तर सचिवपदी तुकाराम आटाळे यांची निवड जाहीर करण्यात आली. वृक्षाराेपण, शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिली.
कार्यकारिणी निवडीच्या सभेचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी जय गणेश फाउंडेशन संचलित ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर. आर. बावस्कर हाेते. व्यासपीठावर समन्वयक गणेश फेगडे, प्राचार्य सतीश कुलकर्णी, नाट्यलेखक विरेंद्र पाटील यांची उपस्थिती हाेती. कलाशिक्षक राजेंद्र जावळे यांनी प्राचार्य सतीश कुलकर्णी यांच्या जीवनकार्यावर तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नेमाडे यांनी फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. यंदाचा गणेशाेत्सव आगळावेगळा साजरा करण्यात येणार आहे. आठवडाभरात त्याची रुपरेषा निश्चित हाेईल, असे त्यांनी सांगितले.

फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
जय गणेश फाउंडेशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र यावलकर, सचिव तुकाराम आटाळे यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत समन्वयक गणेश फेगडे, सहसचिव रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण पाटील, कार्याध्यक्ष डाॅ. अभय काेटेचा, उपाध्यक्ष नीलेश काेलते, मनाेज चाैधरी, काेषाध्यक्ष राहूल भावसेकर, सरचिटणीस तुषाार झांबरे, सहसरचिटणीस हरीष ससाणे, हिशाेबनीस अनिल महाजन, कायदेशीर सल्लागार अॅड मनीष सेवलानी, ऑडिटर आर. बी. चाेपडा, कायम निमंत्रित दिनेश घुले, धीरज धांडे, अनुपसिंग ठाकूर, सल्लागार बाबूसेठ चाेरडिया, सुधीर देशपांडे, अनिल वानखेडे, ललित धांडे, मार्गदर्शक बापू मांडाळकर, ए. व्ही. चाैधरी, मधुकर खराटे यांचा समावेश आहे.


