भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील सिंधी काॅलनी मधील मनोहरलाल संतुमल वत्यानी यांचे भुसावळ शहरातील जामनेररस्त्यावरील हसन अली प्लाॅट येथे साई स्वीट हे दुकान असुन दि.९ मार्च रोजी रात्री ९ ते दि.१० मार्च रोजी सकाळी ९ वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलुप तोडुन दुकानातील ६ हजार रु. रोख व ४ हजार ५०० रु. किमतीचे गोल्ड प्लक कंपनीचे ५० सिगारेट पाकिट चोरीस गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस विभागाला आज दि.१४ रोजी गुप्त माहीती मिळाली की, दोन संशयित भुसावळ शहरातील खडका चौफुल्ली भागात संशयास्पद फिरत आहे त्या वरून गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ सापळा रचून शिताफीने दोघांना ताब्यात घेतले.किसन पन्नालाल धोबी(वय २२) रा.महात्मा फुले नगर भुसावळ व योगेश दिनकर कोळी(वय१८)रा.भारत नगर भुसावळ हे त्यांची नावे आहेत. त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यात चोरी केल्याचे सांगितले वरुन त्यांना अटक करण्यात आली. सदर आरोपींनी भुसावळ शहरातील हुंडाई शोरुम मधील चोरीचेही कबूल केले आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप परदेशी,अनिल मोरे,एएसआय तसलीम पठाण, पोहेकाॅ.सुनिल जोशी,शंकर पाटील,पोना.रविद्र बि-हाडे,रमण सुरळकर,उमाकांत पाटील,महेश चौधरी,पोकाॅ.विकास सातदिवे,श्रीकृष्णा देशमुख,दिनेश कापडणे, ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी यांनी केली असुन तपास पोहेकाॅ. मिलिंद कंक हे करीत आहे.



