गाडगेबाबा अभियांत्रिकी तर्फे कोरोना जनजागृती करण्यासाठी शहरात ठीकठिकाणी बॅनर्स

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील हिंदी सेवा मंडळ संचालित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोरोना या संसर्गजन्य आजाराबद्दलची माहिती भुसावळ शहरातील नागरिकांना, विद्यार्थी व पालकांना व्हावी या अनुषंगाने कोरोना व्हायरस बचावासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहे.
कोरोनाबाबत जनता व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने महाविद्यालयाने कोरोना जनजागृती सुरू केली आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी सांगितले.
डॉ.सिंह यांच्या संकल्पनेतून कोरोना व्हायरसविषयी बॅनर्स द्वारे विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच प्रतिबंधात्मक उपायांचीही माहिती देण्यात आली. कोरोना आजाराची लक्षणे मुख्यत: श्वसनसंस्थेशी निगडित असतात. या विषाणूचा हवेतून प्रसार होत नसून, लागण विशेषत: डोळे, नाक व तोंडाद्वारे होते म्हणून वैयक्तिक स्वच्छतेसोबतच मास्क, रूमालचा वापर नियमित करावा, जेणेकरून कोरोनापासून बचाव होईल. कोरोना आजारासोबतच इतर आजारांपासून बचाव व्हावा, विद्यार्थ्यांना लक्षणे व उपाययोजनांची माहिती व्हावी यासाठी आरोग्यदायी सवयींची रूजवणूक करण्यात आली. तसेच लक्षणे आढळून आल्यास बेजबाबदारपणे वागू नये, उपचारासाठी आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोना विषाणूबद्दल काळजी करू नका, सावध रहा, अफवांवर विश्वास ठेवू नका, स्वत:ला व इतरांना सुरक्षित ठेवा असे डॉ.राहुल बारजिभे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *