भारतीय बौध्द महासभाची भुसावळ विधानसभा क्षेत्र चाचपणी

भुसावळ:- जळगाव जिल्हा शाखा (पूर्व ) अंतर्गत तालुका शाखा भुसावळ यांचे विद्दमाने दिनांक 16/08/2024 शुक्रवार रोजी माता यशोधरा नगर (संबोधी बुद्ध विहार ) भुसावळ येथे आयोजित केलेली बैठकीच्या जागेत बदल करण्याचा आला आहे.

सदरची बैठक ही त्याच दिवशी त्याच वेळेला अर्थात दिनांक 16/08/2024 शुक्रवार रोजी दुपारी ठीक 3-00 वाजता, ठिकाण:- पीपल्स स्कुल (बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल )पिळोदा रोड, पोद्दार शाळेच्या मागे या ठिकाणी आयोजित केलेली आहे.
तरी सर्व भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा पदाधिकारी महिला /समता सैनिक दल, भुसावळ तालुका शाखा पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक / शिक्षिका, बौद्धाचार्य, माजी श्रामनेर, भुसावळ शहर व तालुक्यातील सर्व ग्रामीण शाखा, बौध्द उपासक व उपासिका तसेच ज्याना बाबासाहेब आंबेडकर घराण्याचा आदर आहे. जे या घराण्याशी व चळवळीशी एकनिष्ठ आहे. अश्या सामाजिक, धार्मिक, संघटना समविचारी सर्वांनी या बैठकीला उपस्थित रहाचें आहे. या बैठकीला नाशिक विभागीय सचिव आद. के. वाय. सुरवाडे , नाशिक विभागीय सदस्या. लताताई तायडे, जिल्हा अध्यक्ष आर. एन. वानखेडे, जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे,महिला जिल्हा अध्यक्षा प्रियंका अहिरे, जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार,तसेच जिल्हा कार्यकारणी सर्व पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
तरी सर्वांनी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल, पोद्दार स्कूलच्या मागील पीलोदा रोड या ठिकाणी वेळेवर उपस्थित रहावे असे आव्हान भुसावळ तालुका अध्यक्ष उत्तमराव सुरवाडे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.