भुसावळ – महिला पतंजली योग समिती भुसावळ तर्फे
जडीबुटीदिवस व 2024 वर्तमान युगचे धन्वंतरी आयुर्वेद शिरोमणी परम श्रद्धेय पूज्य आचार्यश्रींचा जन्मदिवस त्या निमित्ताने भुसावळ ,येथे गजानन महाराज मंदिर,लक्ष्मि नारायण नगर. येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण :करण्यात आले .

यावेळी नगर सेवक किरण कोलते यांच्या हस्ते वृक्ष दिंडीचे उद्द्घाटन करण्यात आले. लक्ष्मीनारायण नगर मध्ये भव्य अशी रॅली काढण्यात आली.त्यामध्ये झाडे लावा झाडे जगवा. करे योग रहे निरोग अशा घोषणा देण्यात आल्या.तालुका प्रभारी मीना राजपूत यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राज्यकार्य करणी सदस्या महानंदा पाटील यांनी उपस्थित महिलांना योगा चे महत्त्व पटवून दिले,
प्रसंगी जिल्हा प्रभारी जयश्री पाटील, तालुका प्रभारी मीना राजपूत, युवती प्रभारी राजश्री बादशाह, जिल्हा मीडिया प्रभारी मंदाकिनी केदारे,तसेच सर्व योग शिक्षक वर्षा लोखंडे,माला चौधरी, सुरेखा पाटील, वंदना जंगले, उपस्थित होते, तसेच 100 योग साधक उपस्थित होते. सोनल,सुनीता वाघोडे, चैतली सैतवाल, पूनम सदावर्ते, हेमलता देशमुख यांचे सहकार्य मिळाले.


