मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची प्रचंड मागणी लक्षात घेता तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते रकसोल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर दरम्यान विशेष गाडी चालविणार आहे.
१) लोकमान्य टिळक टर्मिनस ते रकसोल विशेष ( २फेरी )
०५५८६ विशेष दिनांक ०४.०८.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.३५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०७.४५ वाजता रकसोल येथे पोहचेल.
०५५८५ विशेष दिनांक ०२.०८.२०२४ रोजी रकसोल येथून १६.५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०५.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल.
थांबे -: कल्याण, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी , पंडित दिन दयाळ उपाध्याय, पटना, बरोनी, समस्तीपूर, दरभंगा, कमतौल, जनकपुर रोड, सीतामढ़ी जंक्शन.
सरंचना -: १४ शयनयान, ८ जनरल सेकंड क्लाससह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (२४ डब्बे)
२) लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर ( १६ फेरी )
०५३२६ विशेष दिनांक ०७.०८.२०२४ ते ३०.०८.२०२४ पर्यंत प्रत्येक बुधवार आणि शुक्रवार रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १०.२५ वाजता वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.०० वाजता गोरखपूर येथे पोहचेल.
०५३२५ विशेष दिनांक ०५.०८.२०२४ ते २८.०८.२०२४ पर्यंत प्रत्येक सोमवार आणि बुधवार रोजी गोरखपूर येथून २१.१५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०७.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल.
थांबे -: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नासिक, भुसावळ, खंडवा, भोपाल, बीना, झाशी , ओराई, कानपुर, लखनौ, बाराबंकी, गोंडा, मनकापूर, बस्ती, खालिदाबाद.
संरचना: एक वातानुकूलित-2 टियर, ३ वातानुकूलित -3 टियर, १० शयनयान श्रेणी, ०२ द्वितीय श्रेणी , 2 लगेज कम गार्ड ब्रेक वैन।
आरक्षण: विशेष ट्रेन ०५५८६ आणि ०५३२६ साठी विशेष शुल्कावर बुकिंग दि. ०३.०८.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



