भुसावळातील नाहाटा महाविद्यालय परिसरात 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग –

भुसावळ : भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालयामागील एका भागातील रहिवासी असलेल्या 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग करून शिविगाळ करण्यात आली. याप्रकरणी संशयीताविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा
19 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार, रविवार, 28 रोजी रात्री साडेआठ वाजता पीडीता गिरणीवरून दळण आणत असताना संशयीत विजय योगराज बर्‍हाटे (नाहाटा कॉलेजमागे, भुसावळ) याने पीडीतेचा हात धरुन तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे असभ्य वर्तन केले व शिविगाळ केली. हा प्रकार पीडीतेने आईला सांगितल्यानंतर त्यांनी आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतर उलट आरोपीने त्यांनाच शिविगाळ केली. पीडीतेने याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार भाऊसाहेब पाटील करीत आहेत.