भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील आर्या फौडेशन तर्फे जागतिक महिलादिन व शिवजयंतीचे औचित्य साधून आज १२ मार्च रोजी महिलांसाठी एकदिवशीय मोफत थायरॉईड तपासणी शिबीर तसेच आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. स्थानिक टिंबर मार्केट भागातील नवजीवन हॉस्पीटल येथे गुरुवार १२ रोजी दुपारी १२ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात सुमारे 200 महिलांनी आरोग्य तपासणीसह थायरॉइड तपसनीचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन टिंबर मार्केट भागातील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळयास माल्यार्पण करण्यात येवून अभिवादनाने झाली . या समारंभाचे अध्यक्षस्थानी सखी श्रावणीच्या अध्यक्षा राजेश्री नेवे या होत्या . तर व्यासपीठावर फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ वंदना वाघचौरे , स्कैन गृप च्या सौ संगीता भामरे, पत्रकार उज्वला बागुल , सौ भाग्यश्री नेवे, सौ मायाताई चौधरी, लताताई तायडे सौ सुवर्णा इंगळे अर्चना इंगळे , मंदाकिनी केदारे,
प्राची पाठक, आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या. प्रसंगी शिवजयंती व महिला दिनानिमित्त केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा डॉ वंदना वाघचौरे यांनी करून शिबीराच्या आयोजनाबद्दलची पार्श्वभुमि स्पष्ट केली. शहरात महिलांच्या आरोग्याकरीता सजग असलेली आर्या फाउंडेशनने घेतलेला कार्यक्रम अतिशय स्तुत्य असल्याचा सुर उपस्थित मांन्यवरा मधून उमटला . यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
या शिबिरात महिलांची आरोग्य तपासणी डॉ. वंदना वाघचौरे यांनी केली तसेच महालैबचे यावल शाखेचे अशोक तायडे, वसंतकुमार संदानशिव, यांचेसह महालैब ग्रामीण बँक सखी अश्विनी कोळी , यांनी थायरॉइड च्या तपासणी करिता लागणार रक्तांचे नमूने घेवून विशेष सहकार्य केले कार्यक्रम यशस्वितेसाठी मालती येवले ,सुरेखा साळूख़े यांच्यासह नवजीवन हॉस्पिटल स्टॉफ कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले .
यावल येथे १४ रोजी शिबिर
आर्या फाउंडेशन च्यावतीने यावल शाखेत शनिवार दि.१४ मार्च रोजी
दुपारी १२ ते ५ या वेळात जिनिंग प्रेस,यावल येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . तरी या शिबिराचा महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डॉ वंदना वाघचौरे यांनी केले आहे


