भुसावळ – येथिल ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता १० वीच्या ३०० विद्यार्थ्यांनी तंबाखू पासून होणारे दुष्परिणाम या विषयावर गुरुवारी नुक्कड पथनाट्य सादर केले.यावेळी ताप्ती पब्लीक स्कुल पासून जामनेर रोड, नाहाटा कॉलेजच्या उड्डान पुलापर्यंत रॅली काढून नुक्कड पथनाट्य सादर केले.यावेळी विद्यार्थ्यांनी तंबाखू , सिगारेट,बिडी,गुटखा यावर नाटिका सादर करून यांच्यापासून होणारे दुष्परिणाम कसे असतात याचा संदेश पथनाट्यद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले.
यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर,व्हॉइस प्रिन्सिपल श्रद्धाली घुले,मनप्रित कौर,चिफ ओएस सविता सहजे,गौरी प्रभुदेसाई,प्रतिभा काकडे,वर्षा काळे,मो.कय्युम शेख,पल्लवी बत्रा,अकबर खान,डॅनियल पवार,विजय संकट,मुकेश कोळी
यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
प्रसंगी विद्यार्थ्यांनी हम सब ने एक ही ठाणा तंबाखू को जडसे मिटाणा,एक दो एक दो नशे की लट को छोड दो,नशे को दुर भगाना है यही संदेश बताना है अशा विवीध घोषणा दिल्या.विद्यार्थ्यांच्या हातात धूम्रपान व तंबाखू यांच्यामुळे होणारा दुष्परिणाम चे पोस्टर होते.शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलचे विद्यार्थ्यां नुक्कड पथनाट्य सादर करताना





