जळगाव –
मध्यप्रदेशातील अट्टल दुचाकी चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून अटक केली असून त्याच्याकडून दोन लाख ९० हजार रुपये किंमतीच्या चोरलेल्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरीच्या दुचाकी खरेदी करणार्या तिघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
आरोपी किरण बारेला याने जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून सात दुचाकींची चोरी करीत त्यांची कमी भावात विक्री केली होती. या चोरिच्या दुचाकी मनोज उर्फ मुन्ना कालम वंजारी (राठोड) रा . गंगानगर, बलवाडी, ता.वरला , व गुनीलाल भल्या पावरा वय ३० लाने, ता.चोपडा तसेच सुभाष पावरा ३०, घेगाव, ता.वरला यांनी खरेदी केल्या म्हणून या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. बारेला यांचे सहकारी नाना रायसिंग वासकले वय २२, रा. जामठी, ता.वरला याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, हवालदार नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, सुनील दामोदरे, मनोज दुसाने, महेश महाजन, महेश पाटील, प्रवीण हिवराळे, दीपक शिंदे, अरुण राजपूत, परेश महाजन आदींनी कारवाई केली .
आरोपी किरण तुकाराम बारेला याला अटक करण्यात आली आहे .



