भुसावळ रेल्वे विभागात फुल उधळून होळी साजरी

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ रेल्वे विभाग प्रबंधक विवेक कुमार गुप्ता व सहकारी अधिकारी यांचेसह त्यांच्या परिवाराने फुलांची उधळन करीत मंगळवारी धूलिवंदन जल्लोषात व उत्साहाने साजरे केले .
आपल्या दैनंदिन कामकाजातील तणाव विसरून सर्वानी एकत्र येवून साध्या पद्धतीने आपापसातील मतभेद विसरून , प्रेम व आनंदाने
पाण्याची नासाडी न करता फुलांच्या पाकळ्या उधळीत सण साजरा केला . डीआरएम बंगला येथे यावेळी जमलेल्या सर्वानी आनंदाने म्युझिकच्या तालावर नाचुन धुलीवंदनाचा आनंद व्यक्त केला . प्रसंगी डीआरएम विवेक कुमार गुप्ता यांनी सर्वाना कोरडे रंग लावून शुभेच्छा दिल्या . प्रसंगी भुसावळ येथील विविध विभागातील कार्यरत अधिकारी व कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी वृंद सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *