भुसावळ – गेल्या चार पिढीपासून सुरू असलेली परंपरा आजही येथील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील रहिवासी अनिल बागुल व परिवार सांभाळून आहेत . प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही देवशयणी आषाढी एकादशी निमित्त येथील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील रहिवासी अनिल बागुल व परिवारातर्फे श्री विठ्ठल रुखमाई संस्थान तर्फे बुधवार १७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता निघालेल्या दिंडीचे स्वागत रस्त्यावर भव्य रांगोळी काढून फटाक्यांचे आतषबाजीत अतिशय भक्तिमय वातावरणात उत्साहात करण्यात आले.
यावेळी दिंडीत सहभागी समस्त वारकरी यांचे पुष्पहार अर्पण करून व ओवाळून स्वागत करण्यात आले
दिंडीत सहभागी भाविक वारकरी महिला भगिनी यांना फराळ (साबुदाना खिचडी ) वाटप करण्यात आले .
दिंडी यशस्वीतेसाठी अनिल बागुल , मंदार बागुल ,अजय चौधरी , विजय चौधरी , सनी चौधरी , आकाश कोळी, हर्षल शिवदे , अमोल फेगडे , कैलास ब-हाटे , सुनील शिंपी , यांचेसह समस्त बागुल व मित्र परिवार यांनी सहकार्य केले .

आषाढी एकादशीची मनापासून वाट बघतो – अनिल बागुल.
आषाढी व कार्तिकी एकादशीला दिंडीचे स्वागत करण्याचा फार आनंद होतो आम्ही आषाढी व कार्तिकी एकादशीची मनापासून वाट बघत असतो श्री पांडुरंग कृपेने आजही गेल्या चार पिढीपासून दिंडीचे स्वागत करण्याची ही परंपरा अविरतपणे सुरू आहे . यामधून आईवडीलांचे संस्कार व माणुसकी यासह एकात्मतेचा आनंद आम्हा सर्वांना मिळतो . यंदा आईची उणीव तिव्रतेने जाणवली मात्र तिने दिलेल्या परंपरांचा आदर अविरतपणे सुरू ठेवणार असल्याची प्रतिक्रिया अनिल बागुल यांनी व्यक्त केल्या .




