भुसावळ (प्रतिनिधी )-
नॅशनल हायवे नं. ४६,वांजोळा फाटा येथे बोगदा लवकरात लवकर तयार करावा या मागणी करिता आज ११ रोजी यासंदर्भात येथील नागरिकांनी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे .
येथील शेतकरी,शेतमजुर, राधास्वामी सत्संग,कला
नगर,प्रेरणा नगर,महेश नगर, राजस्थान मार्बल मागील भाग, रेणुका देवी मंदिर परिसर तसेच वांजोळा गाव रहिवासी आम्हास
भुसावळ शहरात जाण्या येण्यासाठी जुना वांजोळा रोड हा सोईस्कर आहे. य्या भागातील नागरिकांना भुसावळ शहरात फिरून नाहाटा कॉलेज कडून जाण्याचे म्हटल्यास कमीत कमी एक ते दीड किलो मिटरचा फेरा पडतो तसेच मुलांना शाळां क्लासेस करीता फिरून
जावे लागेल. अशी परिस्थिती होवू नये आणि गैर सोय होवू नये. म्हणुन वांजोळा फाटा येथे एक बोगद्याचे नियोजन
ठेकेदाराकडून मंजुर करून द्यावा रहिवासी व शेतकरी,शेतमजुर यांनी मागणी केली आहे .
या रहिवाशांची मागणी मान्य न झाल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात
येईल व उपोषण करून सुध्दा बोगद्याची मागणी मान्य न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल तसेच उदभवणाऱ्या परिस्थितीस
ठेकेदार व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला . निवेदनावर प्रमोद वसंतराव पाटिल, अशोक पाटील, रमेश नेमाडे, नितिन वाघ, पंडित काकडे, उल्हास महाजन, भागवत पाटील, सुधीर ठोके, यांच्यासह
या परिसरातील बहुसंख्य
नागरिकांच्या स्वाक्षरी आहे .



