उदया आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडी निघणार :

भुसावळ – उद्या दिनांक १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता भुसावळ रेल्वे स्टेशन येथून केंद्रीय मंत्री खासदार रक्षाताई खडसे यांच्यामार्फत आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडीचे नियोजन करण्यात आले आहे.

या गाडीला केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे तसेच तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते झेंडा दाखवून गाडी पंढरपूर साठी रवाना होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन आयोजकांनी केले .

तरी उद्या दिनांक १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस परिक्षित बऱ्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, शहराध्यक्ष युवराज लोणारी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, युवा मोर्चा अध्यक्ष गौरव आवटे यांनी केले आहे.