भुसावळ – भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी एका बनावट तिकीट तपासणी कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे .

भुसावळ विभागाचे तिकीट तपासणी कर्मचारी अवधीश कुमार आणि जी. टी. साबरे यांनी १२ जुलै २०२४ रोजी ट्रेन क्र. १२१५० भुसावळ- पुणे दरम्यान कार्य करत असताना अहमदनगरमध्ये एक बनावट तिकीट तपासणी कर्मचारी पकडला. वाणिज्य नियंत्रण पुणे यांच्याकडून माहिती मिळाली होती की एक संशयित व्यक्ती प्रवाशांचे तिकीट तपासून पैसे गोळा करत आहे.
अहमदनगर येथे ट्रेन आल्यानंतर, दोन्ही कर्मचाऱ्यांनी गाडी क्रमांक १२१५० च्या सामान्य डब्यात प्रवेश केला आणि त्यांनी एक व्यक्ती प्रवाशांचे तिकीट तपासताना व पैसे गोळा करताना पाहिला. त्याला तिकीट तपासणी कर्मचाऱ्याची ओळख स्थापित करण्यास सांगितले असता, त्याने असफलता दर्शवली.
यानंतर, त्याला पॅन्ट्री कारमध्ये नेण्यात आले, वाणिज्य नियंत्रण पुणे यांना माहिती देण्यात आली आणि बनावट तिकीट तपासणी
कर्मचाऱ्याला पुढील आवश्यक कारवाईसाठी दौंड कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले.


