भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडीयम स्कूलमध्ये स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी शाळेच्या प्रिंन्सिपल नीना कटलर व शाळेच्या व्हॉईस प्रिंन्सिपल श्रद्धाली घुले,मनप्रीत कौर यांनी वृक्षारोपण केले. यावेळी पर्यावरण जनजागृतीसाठी शाळेच्या परिसरात स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.
या रॅलीत झाडे लावा झाडे जगवा,झाडे जगतील तर पाणी मिळेल,जल है तो कल है अशा विवीध घोषणा स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांतर्फे देण्यात आल्या.रॅली ही शाळेतून निघून विकास कॉलनी,शिव कॉलनी,गायत्री नगर व महेश नगरच्या काही भागातून शाळेत समारोप झाला.शाळेच्या परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.
प्रिंन्सिपल निना कटलर यांनी स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण बद्दल मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या की आपल्या घराजवळ व आजूबाजूच्या परिसरात झाडे लावा.घरातील प्रत्येक एक सदस्याने किमान एक झाड तरी लावले पाहिजे.झाडे लावल्यावर त्याचे संगोपालन व्यवस्थित करायला पाहिजे अशी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.
यावेळी गाईड कॅप्टन अनिता कोळी,स्काऊट मास्टर आकाश परदेशी,प्रतीभा काकडे,रितू प्रभूदेसाई,वर्षा काळे,पोर्णिमा चौधरी,मोहम्मद कय्यूम शेख,राजेश टंडन,क्रीडा शिक्षक अर्जुन सणस,विजय संकट,अकबर खान,डॅनियल पवार, राहुल सोनवणे,अनघा पाटील यासह अन्य शिक्षक उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये वृक्षारोपण करताना निना कटलर सोबत अनिता कोळी,श्रद्धाली घुले,मनप्रीत कौर,रितू प्रभूदेसाई,वर्षा काळे,पोर्णिमा चौधरी,प्रतिभा काकडे आदी.


