नशिराबादनजीक वकिलाच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवली –

नशिराबाद : वकिलाच्या गळ्यातील एक लाख 10 हजारांची सोन्याची चैन अज्ञात व्यक्तीने बळजबरीने हिसकावून लांबवली. ही घटना शुक्रवार, 5 जुलै रोजी रात्री 11 वाजता घडली. याप्रकरणी शनिवार, 6 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता नशिराबाद पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एडव्होकेट प्रकाश रामदास मोझे-पाटील (63) शिवकॉलनी भुसावळ येथे राहणारे. नशिराबाद ते भुसावळ रोडवरील मेरीमाता चर्च जवळील रोडने ते जात असतांना अज्ञात व्यक्ती हा त्यांच्याजवळ आला व त्याने प्रकाश मोझे पाटील यांच्या गळ्यातील एक लाख 10 हजार रुपये किंमतीची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून पळ काढला. हा प्रकार शुक्रवार, 5 जुलै रोजी रात्री 11 वाजता घडला. त्यानंतर प्रकाश मोझे पाटील यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शनिवार, 6 जुलै रोजी सायंकाळी सात वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड करीत आहे.