दिव्यांग अल्पवयीन तरुणीला बलात्कार करून केले गर्भवती..भुसावळ तालुक्यातील घटना :

भुसावळ – भुसावळ तालुक्यामधील. एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर जोगलखेरी शिवारात तरुणाने दिव्यांग असताना देखील बलात्कार केल्याची व त्यातून ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील एका गावात राहणारी तरुणी ही सध्या जामनेर तालुक्यातील एका शेतात परिवारासह राहते. तिचा परिवार जून महिन्यामध्ये कामानिमित्त भुसावळ तालुक्यात एका शेत शिवारात आला होता. (केसीएन)त्यावेळेला जोगलखेडे शिवारामध्ये संशयित आरोपी गोपाल भिमसिंग बारेला याने ती दिव्यांग व अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील गैरफायदा घेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. त्यातून ती गर्भवती राहिली.

या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक बबन जगताप हे करीत आहेत.