पुन्हा एकदा.गुरुजी हरले,राजकीय पक्ष जिंकले – प्र.ह.दलाल सर …

भुसावळ –
नुकत्याच शिक्षक मतदार संघातील इतिहास कलंकित करून नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील निवडणूक पार पडली . कालच तिचा निकालही जाहीर झालाय,अन् पुन्हा एकदा गुरुजी हरले व !राजकीय पक्ष जिंकले!!असे उत्स्फूर्त उद्गार निघाले!अखेर पवित्र शिक्षण क्षेत्राचा ही झाला राजकीय आखाडा!असेच सुरू राहिले तर आधीच आयसीयूत असलेले शिक्षणक्षेत्र कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित!
आदरणीय बाबा साहेबांनी दूरदृष्टीने बेलगाम धावणाऱ्या सत्तासुरांवर अंकुश ठेवून लोकशाही अधिक निर्दोष,बळकट होण्यासाठी घटनेत तरतूद करून विधान परिषद ह्या वरिष्ठ सभागृहात फक्त राजकीय पक्षांचे च आमदार अनियंत्रित कामकाज करू नये म्हणून काही जागा पदवीधर मतदार संघातून तर काही जागा शिक्षक मतदार संघातून निवडून येण्यासाठी राखीव ठेवल्यात.हेतू स्पष्ट च होता की शिक्षणाची कोणतीही अट नसल्याने धन शक्तीच्या आधारे निवडून येणाऱ्या राजकीय पक्षांच्या आमदारांकडून होणाऱ्या कामकाजावर उच्च शिक्षित,अभ्यासू,राजकारण विरहित, निःपक्षपाती पणे विवेक बुद्धीने सर्वांगीण विचार करून शासनाच्या कामकाजावर अंकुश ठेवतील. आणि काही वर्ष तरी घटनाकरांच ही मनीषा बहुतांशी पूर्णही झाली
सुमारे साठ सत्तर वर्षांपूर्वी शिक्षणक्षेत्रात काळोखाचे साम्राज्य होते.शिक्षकांसाठी कोणताही कायदा नव्हता,कोणतेही पे स्केलं नव्हते,त्यांची नेमणूक जून/जुलै ते एप्रिल अखेर अशी असे मे /जून ब्रेक अर्थात पगार नाही शिवाय पुढच्या वर्षी घेतील की नाही ही चिंता!उद्यापासून तुम्ही घरी जा असे तोंडी जरी सांगितले तरी संपली नोकरी!त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी स्वतंत्र न्यायालय नव्हते कोणत्याही सोई सवलती नव्हत्या . शिक्षक त्रस्त होते,पण अन्यायाला घाबरतील ते आर्य चानक्यांचे वंशज कसले?त्यांनी घटनेतील तरतुदींचा योग्य उपयोग करून घेतला शिक्षक मतदार संघातून आपलाच एक निस्वार्थी,अभ्यासू,निर्भिड शिक्षक आमदार म्हणून निवडून दिला त्यानेही परिस्थितीचे चटके सोसले होते शिक्षक व शिक्षण क्षेत्राची दुरवस्था त्याला चांगलीच न्यात होती असे पूर्ण राज्यातून चार पाच आमदार शिक्षक मतदार संघातून निवडून पाठविले अन् त्यांनी प्रचंड बहुमत असलेल्या सरकारलाही वाकवले,सभागृहाला ही पाझर फुटलाआणि शिक्षणक्षेत्रात सुखाचे चांदणे चमकू लागले!.हळू हळू बँक मार्फत पगार,सेवा शास्वती,नियुक्ती आदेश,रजा नियम,शिक्षण कायदा,न्यायाधिकरण इ ची प्राप्ती झाली.पण…पण पौर्णिमेच्या चंद्रलही एक दिवस ग्रहण लागतेच ना?बहुतांशी संस्थाचालक राजकीय कार्यकर्ते,आमदार,खासदार,नामदार होते .त्यांच्या स्वार्थाला प्रतिबंध झाला ते बे चैन होते शिक्षक त्यांच्या संघटना सोडायला तयार नाही हे पाहून त्यांनी चोरपावलांनी शिक्षक संघटनेत प्रवेश केला ,राजकीय कुट नीती वापरून शिक्षक संघटनेत जात,धर्म,उच्च नीच,असे भेद निर्माण करणारे वाद पेरले स्वतः अलिप्त राहून आग लावली आणि अखेर राजकीय कुटनितीच यशस्वी झाली हळू हळू संघटनाच त्यांच्या दावणीला वांधक्या जावू लागल्यात आता शिक्षक आमदार कोण हेही राजकीय पक्ष ठरवू लागले.निवडून येण्यासाठी “सर्व”करू लागले.आणि शिक्षकांच्या घराचे वासे पुन्हा एकदा फिरले!पूर्वी शिक्षक आमदारांचा शासनावर दबाव असे आता शिक्षक आमदारही आमच्या खिशात आहेत अस शासन बोलू लागले.शिक्षकांच्या प्रश्नावरही शिक्षक आमदार मौन धारण करून मंत्रांच्या इशाऱ्यावर मना दोलवू लागले!अन् व्हायचा तोच परिणाम होवू लागला शिक्षकांनी जे पेरले तेच उगवले !विषाची फळे चाखण्याची वेळ स्वतःहून ओढवून घेतली!
काय झाले परिणाम?… शिक्षकांना मिळालेल्या सोई सवलती हळू हळू काढून घेतल्या जावू लागल्या!प्रथम घाव पडला तो विना अनुदान तत्त्वाचा! लोकशाही तले मूलभूत कर्तव्यच सरकार नाकारू लागले!संस्था चालकांनी शासनाचे नियंत्रण नकोच होते पुन्हा एकदा शिक्षकांचा नियमानुसार मिळणारा पगार केवळ कागदावर दिसू लागला!अगदी तुटपुंज्या पगारावर सूट बुट , ताय लावून आनंदी मुखवटा लावून हजारो उच्च शिक्षित तरुण तरुणी आनंद दाई शिक्षण देवू लागले!स्वाभिमान घरच्या खुंटीवर टांगून दादा साहेब,नाना,साहेब,बाबा,साहेब,भाई साहेब यांना त्रिकाळ मुजरा करून ते सांगतील तीच पूर्व हे मुकाट्याने म्हणायचे!त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कोणत्याही निवडणुकीत स्व खर्चाने प्रचार करायचा,त्यांच्या वाढ दिवसाच्या जाहिराती लावायच्या!असे लाचारीचे जिणे पद्री पडले!विना अनुदानाची मुक्त खिरा पद वाटून राजकीय नेत्यांच्या चार पाच पिढ्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था झाली खरी,पण उद्ध्वस्त झालेत ते हजारो तरुण शिक्षकांचे संसार!राख झाली त्यांनी रंगविलेल्या मुलाबाळांच्या सुंदर भावी जीवनाची!नंतर आली शिक्षण सेवक योजना!पेन्शन गेले!संच मान्यतेचे नियम लावून पंधरा वीस वर्ष सेवा झालेलेही हजारो शिक्षकांवर अतिरिक्त होवून बसण्याची वेळ आली!आता तर अनेक अनुदानित शाळा च शेवटचे स्वाश घेत आहेत.सारे शिक्षण क्षेत्रच राजकीय धनदांडग्यांना चरण्यासाठी रान मोकळे! आज शिक्षक हतबल झालाय,त्याचा कणाच मोडला! मग्रूर संस्था चालक,भ्रष्ट अधिकारी,गेंड्याच्या कातडीचे सरकार,भारंभार तत्व हिन योजना,रोज नवे परिपत्रक,शिक्षणाचा नव्हे नव्हे आनंदी अन् गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचा तोंडी जप, बोलाचाच भात अन् ..
एव्हढे सर्व अनर्थ शिक्षकांच्या चुकीच्या निर्णयाने झालेत.तो क्षणिक सुखासाठी विकला गेला अर्थात सर्वच शिक्षक असे नाहीत मिळालेली पाकीट,साडी ,ड्रेस, इ न स्वीकारता परत पाठवून देणारे स्वाभिमानी शिक्षकही खूप आहेत,त्यांच्या पुण्याईने बुडणाऱ्या नावेला थोडा तरी आधार मिळतोय पण निर्लज्ज पणें इमान विकणारे, एजेंट मानून काम करणारे घरभेदी ही काही कमी नाहीत हे सत्यही नाकारून चालणार नाही. बहुसंख्य शिक्षक ना इलाज म्हणून गप्प बसतात कारण त्यांना भीती वाटते टी संस्था चालकांची! पण शिक्षकच भित्रा,अन्याय मुकाट्याने सहन करणारा, नीर क्षीर वृत्ती नसणारा झाला तर तो अन्यायाला वाचा फोडणारे निर्भिड पिढी तरी कशी घडविणारं? जुलमी राजसत्तेला उलथून टाकण्याची प्रतिज्ञा घेणार नवे चाणक्य कसे घडविणारं?शिक्षकच आहेत शिक्षण क्षेत्राचे खरे भाग्य(अन् दुर्भाग्य ही) घडविणारे शिल्पकार! तेव्हा उठा!जागृत व्हा!धोक्याची घंटा तर वाजली आहेच! आता तरी सावध होवू या!शिक्षक मित्रानो आपल्या क्षेत्रात येणाऱ्या असंख्य समस्यांवर कायम स्वरुपी उपाय हवा असेल तर वरवरच्या नजरेने पाहू नका ,खोलवर जा,निःपक्ष पाती चिंतन करा,म्हण नीजे कायम स्वरुपी उपाय आणिसापडेल योग्य व्यक्तींचे हात हातात असले म्हणजे चुकीच्या लोकांचे पाय हाती आणि आणिधरण्याची वेळ येत नाही!आणि हेही लक्षात असू द्या की सगळीच वादळे काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नाहीत तर त्यातील काही तुमचा रस्ता मोकळा करण्यासाठी पण येतात!तेव्हा झाले ते झाले,निराश न होता ठण कावून सांगा त्या राजकारण्यांना..”मेरा पानी उतरता देख,किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हु,लोटकर जरूर आवूंगा!!