एम आय तेली इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने शहरातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान ; केक कापून महिला दिन केला साजरा

भुसावळ (प्रतिनिधी )-
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येथील एम आय तेली इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने शहरातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला .
खडका रोडवर असलेले स्थानिक एम आय तेली इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित कार्यक्रमात मुख्याधिकारी सौ करुणा डहाळे , प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी सावकारे , चाईल्ड काउन्सलर सौ आरती चौधरी , पत्रकार उज्वला बागुल , महिला वकिल संघ अध्यक्ष सौ. जास्वंदी भंडारी , वाहतूक शाखा महिला पोलिस कर्मचारी सपकाळे , विजया निळे , महिला समुपदेशन केन्द्राच्या काउंसलर सौ भारती म्हस्के व्यासपीठावर उपस्थित होत्या. तसेच शाळेतील दुपार सत्रातील सर्व शिक्षिका, तसेच विद्यार्थ्यांचे पालक (महिला )व गृहिणी उपस्थित होत्या . प्रसंगी शाळेच्यावतीने उपस्थित मान्यवर महिलांना भेटवस्तु व गुलाबपुष्प देवून सन्मानित करण्यात आले .तसेच यावेळी मान्यवरां मधून सौ रजनी सावकारे, सौ आरती चौधरी , सौ जास्वंदी भंडारी , सौ भारती म्हस्के, उज्वला बागुल ,यांचेसह
शिक्षक व विद्यार्थ्यांनी महिलां दिना बद्दल माहिती सांगून महिलावर होणारे वाढते अन्याय व अत्याचार थाबविन्याकरीता विद्यार्थ्यानी लहाणपणा पासून आपल्या संपर्कात येणाऱ्या महिलांचा आदर व सन्मान करायला शिकावे असे आवाहन सौ रजनी सावकारे यांनी यावेळी केले .काही विद्यार्थिनीनी भारतातील कर्तुत्ववान महिलांचे प्रतीकात्मक वेशभूषा परिधान करून त्यांची वैशिष्ठे व माहिती सादर करीत सर्वांचे लक्ष वेधले.मुख्याध्यापक आबिद सर यांनी प्रास्ताविक केले .
यावेळी सत्कारार्थी महिलांच्या हस्ते महिलादिन वर्धापनाचा केक कापण्यात येवून आनंद व्यक्त करण्यात आला . यावेळी महिलांसह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते .यशस्वितेकरीता शिक्षिका अंजुम खान यांचेसह सहकारी शिक्षिका व शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *