भुसावळ – ताप्ती लेडीज क्लब तर्फे आज दिनांक 21 जून रोजी ताप्ती पब्लिक स्कूलच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.स्मिताताई फालक ,डॉ. सुवर्णा गाडेकर, सौ. आरती चौधरी, भवरलालजी प्रजापती तसेच क्लबच्या संस्थापिका डॉ भाग्यश्री भंगाळे आणि इतर सर्व ताप्ती लेडीज क्लबच्या सदस्या हजर होत्या.

यावेळी योग दिनाचे औचित्य साधून आरोग्यदायी पाककृतींची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात नवनवीन पाककृतीसह सर्व महिलांनी अतिशय उत्साहाने व हिरीरीने सहभाग घेतला. त्यात प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेते काढण्यात आले. मान्यवरांनी अतिशय समर्पक शब्दात योगाचे महत्त्व पटवून दिले. भवरलालजी प्रजापति यांनी योगाचे अनेक प्रात्यक्षिक दाखवले आणि ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर याचे रोगमुक्ती मध्ये किती महत्त्वाचे योगदान आहे हे सांगितले. त्यांनी योगाचा नियमित सराव करा आणि आयुष्य निरोगी आणि आनंदी करा असा मौलिक सल्ला दिला. तसेच डॉ. सुवर्णा गाडेकर यांनी योगाच्या आरोग्यदायी शुभेच्छांसह योग निसर्गाजवळ कसा नेतो आणि योग ईश्वराची अनुभूती देतो असे सांगितले आणि अनेक आरोग्यदायी टिप्स गृहिणींना दिल्या. सौ आरती चौधरी यांनी योग आपल्याला अशी ऊर्जा देतो की जी आपण हजारो तास काम करूनही मिळू शकत नाही असे उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. तसेच मानसिक आरोग्य कसे राखावे आणि त्यासाठी काय करता येईल यासाठी अनेक आयडिया त्यांनी सांगितल्या. दररोज नियमित ताप्ती ग्राउंड वर योगा प्राणायाम तसेच एरोबिक्स निशुल्क घेतले जाते. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन फालक, आदरणीय महेश फालक, यांचे प्राचार्य डॉ एस .व्ही. पाटील सर यांचे सहकार्य लाभले


