भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील शासकीय विश्रामगृहात जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग व भुसावळ शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने महिला दिनानिमित्त ज्या महिलांनी त्यांच्या कुटुंब,समाज व शासनाप्रती मोलाचं योगदान दिले अशा महिलांचा गौरव उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचे समन्वयक योगेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जळगांव जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सातपुडा कन्या संपादिका उज्वला बागुल, नाट्य कलाकार कल्पना कोल्हे,महिला काँग्रेस अनु जाती विभागाच्या उपाध्यक्षा चंद्रकला इंगळे व ज्या महिलांनी आपल्या कुटुंबासाठी कुटुंब प्रमुख म्हणून मोलाचं योगदान दिलं अशा महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमा प्रसंगी उज्वला बागूल,कल्पना कोल्हे ,विवेक नरवाडे,व योगेद्र पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सुजाता सपकाळे,अनिता तायडे,विजया जोहरे,उषा साळवे,शोभा सपकाळे,अर्चना सपकाळे,ज्योती कांबळे,विनोद पवार,सुरेश सपकाळे,नितीन वाघ,संदिप सुरवाडे आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन सुनिल जोहरे यांनी मानले.




