भुसावळ

दरवर्षीप्रमाणे श्री राधाकृष्ण प्रभात फेरी परिवारातर्फे वृक्षारोपण केले जाते व त्याचे संपूर्ण संगोपन संवर्धन केले जात असते आजपर्यंत हजारो झाडे लावून जगवलेली आहेत त्यांचे वेळोवेळी वाढदिवसही साजरी केले जातात यावर्षी सुद्धा भुसावळ शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक श्री ब्रिजमोहन अग्रवाल जी व त्यांच्या परिवार आणि श्री राधाकृष्ण प्रभात फेरी चे प्रमुख श्री राधेश्याम जी लाहोटी व परिवारातर्फे 150 वृक्षांचे वृक्षारोपण आज शिवनारायण नगर येथे हरित शहर स्वच्छ शहर संकल्पना राबविणारे पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आली
सर्वप्रथम ज्येष्ठ उद्योजक ब्रिजमोहन अग्रवाल जी यांच्या हस्ते वृक्षांचे विधिवत पूजन केले .त्यानंतर नारळ वाहून वृक्षारोपणा सुरुवात केली सर्वप्रथम अग्रवाल परिवारातर्फे वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर श्री राधाकृष्ण प्रभात फेरी परिवार तर्फे आलेल्या सर्व सदस्यांतर्फे वृक्षारोपण करण्यात आले ही वृक्ष जवळपास दहा ते पंधरा फुटापर्यंतची लावण्यात आली वृक्षारोपणाची संगोपन आणि संवर्धनाची जबाबदारी संपूर्ण अग्रवाल परिवाराने घेतली आहे . यावेळी राधाकृष्ण प्रभात फेरी परिवाराचे प्रमुख राधेश्याम लाहोटी यांनी प्रभाग फेरीमार्फत विविध उपक्रमांची माहिती देऊन या वर्षाचे पहिले वृक्षारोपण अग्रवाल परिवार शिवनारायण नगर आपल्या प्रभात फेरी च्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेला आहे अजूनही मोठ्या प्रमाणात आपल्याला वृक्षावर कोणाचे कार्यक्रम करावयाचे असून त्याचे संगोपन संवर्धनाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे त्यानंतर अग्रवाल परिवाराचे प्रमुख म्हणून काकासो ब्रिजमोहन अग्रवाल जी यांचा सत्कार राधेश्यामजी लाहोटी यांनी केला यावेळी गोपाल जी अग्रवाल निर्मलजी अग्रवाल नितीन अग्रवाल उपस्थित होते यांनी ही आपले एक एक झाड लावले त्यानंतर लोको पायलट श्री दुबेजी हेही सातत्यपूर्ण वृक्षारोपण करत असतात व भुसावळ नगर परिषदेचे ब्रँड अँबेसिडर तथा पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील सर हरित शहर स्वच्छ शहर संकल्पना राबवून जनजागृती करत आहेत मोठ्या प्रमाणात सातत्याने वृक्षारोपण व विविध प्रसंगी वृक्ष भेट करत असल्याने दोघांचा सत्कार अग्रवाल परिवारातर्फे करण्यात आला त्यानंतर राधाकृष्ण प्रभात फेरी चे प्रमुख प्रतिनिधी म्हणून अग्रवाल परिवारातर्फे राधेश्यामजी लाहोटी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटना तसेच परिवाराचे संजय भाऊ अग्रवाल जीआर ठाकूर मामा जे बी कोटेचा मदन बोरकर संजय लाहोटी अर्जुन पटेल गोपाळ जांगिड श्याम काबरा संजय फालक त्यासोबत मोठ्या प्रमाणात महिला भगिनी वर्ग व इतर नागरिक उपस्थित होते राधाकृष्ण परिवारातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला .श्री राधेश्यामजी लाहोटी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर उपस्थितांचे व अग्रवाल परिवाराचे आभार नाना पाटील सर यांनी मानले





