भुसावळ दुहेरी हत्याकांडाचा आणि आ . सावकारे बंधूस धमकी प्रकरणाचा निषेध : उद्या प्रांताना देणार निवेदन :

भुसावळ – शहरात नुकतीच भाजपा नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ता सुनील राखुंडे यांची निर्घृण हत्या करून शहरातील गुंड प्रवृत्तीचे लोकांनी दहशत निर्माण केलेली आहे.याच पार्श्वभूमीवर काही गुंडांनी आमदार संजय सावकारे यांचे बंधू प्रमोद सावकारे यांना ठार मारण्याची धमकी देऊन आमदार संजय सावकारे यांच्या परिवारास धमकाविण्याची मजल गेली आहे या हत्याकांडाचा आणि दिलेल्या धमकीचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच या गुंडांचा बीमोड करून त्यांना कायद्याने मोठी शिक्षा व्हावी यासाठी प्रांतअधिकारी,भुसावळ आणि पोलीस उप विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी दिनांक 3 जून ,सोमवारी सकाळी 10 वाजता सर्व नगरसेवक,पदाधिकारी,आणि कार्यकर्त्यांनी यायचे आहे , आवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस परिक्षीत बऱ्हाटे,जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी,शहराध्यक्ष युवराज लोणारी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे यांनी केले आहे…