एस.टी. बस चालकाचा कुलरमध्ये पाणी भरतांना विजेचा शॉक लागून मृत्यू

जळगाव : ड्युटीवरुन घरी आल्यानंतर कुलरमध्ये पाणी भरत असतांना विजेचा शॉक लागून भास्कर आत्माराम बोरसे (वय ४८, मूळ रा. बिबा नगर, ह. मु. कठोरा, ता. जळगाव) या एस. टी. बस चालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचा मुलगा वाचविण्यासाठी गेलेला मुलगा मात्र बालंबाल बचावला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास शहरातील बीबा नगरात घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील कठोरा येथील भास्कर बोरसे हे राज्य परिवहन महामंडळामध्ये चालक म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी शहरातील बिबा शेजारच्यांनी केले रुग्णालयात दाखल भास्कर बोरसे यांना विजेचा धक्का लागून ते गंभीर झाल्याचे कळताच त्यांच्या कुटुंबीयांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने भास्कर बोरसे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.

नुकतेच नवीन घर घेतले असल्याने ते याठिकाणी कुटुंबियांसह राहायला आले होते. शनिवार दि. १ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते ड्युटी वरून काही कामानिमित्त घरी आले होते. त्यावेळेला घरी कुलरमध्ये पाणी टाकण्यासाठी ते गेले असताना त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि ते बाजूला फेकले गेले. या वेळेला त्यांचा मुलगा त्यांना वाचण्यासाठी आला असतांना त्यालाही विजेचा धक्का लागत असताना थोडक्यात बचावला आहे.

या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी रुग्णालयात कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एसटी चालकाच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच एसटी महामंडळातील अनेक कर्मचारी व सहकारी यांनी रुग्णालयात धाव घेतली होती.