भुसावळात जमाअत-ए- इस्लामी हिंदच्या वतीने महिला दिन संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील जमाअत-ए- इस्लामी हिंदच्या वतीने महिला दिनानिमित्त दि. ७ रोजी दुपारी ३ वाजता संस्थेच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयाच्या ज्योती दिदी, अँड. नसीम देशमुख , तापी स्कुलच्या प्रिंसिपल नीना कटलर ,संस्थाध्यक्षा सुमैय्या परवीन आदी उपस्थित होत्या.
यावेळी संस्थाध्यक्षा सुमैय्या परवीन यांनी दिव्य कुरआनच्या विश्‍लेषणार महिलांचे इस्लमामधील महत्व अधिकार व स्वातंत्र्याबद्दल माहिती दिली तर. अँड नसीम देशमुख यांनी महिलांवरील अन्याय ,अत्याचार तसेच कौटुबिक समस्या, यावर मार्गदर्शन केले.प्रिंसीपल निना कलटल यांनी महिलांनी शिक्षण घ्यावे असे आवाहन केले. .
प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार आयोजकांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *