भुसावळ (प्रतिनिधी )-
शहर व तालुक्यातिल कष्टकरी व कर्तुत्ववान महिलांचा सत्कार भुसावळ शिवसेना महिला आघाडीतर्फे महिला दिनाचे औचित्य साधुन शनिवारी करण्यात आला . यावेळी गुलाबपुष्प व गुच्छ देऊन महिलांना शुभेच्छा देवून सत्कार करण्यात आला .
रविवार 8 मार्च रोजी महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. यंदा रविवारी महिला दिन येत असल्याने शनिवार रोजी शासकीय कार्यालये, कोर्ट, पोलीस स्टेशन येथील कार्यरत महिलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला . महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना महिला आघाडी तालुका संघटीका भुराताई चव्हाण यांनी महिलांच्या सन्मानार्थ हा स्वागतसोहळा आयोजित केला होता.
भुराताई चव्हाण यांच्या संकल्पनेतून समाजा सर्वत्र काम करणाऱ्यां कष्टकरी व कर्तुत्ववान महिलामुळे कुटुंबाबरोबरच देश विकासात मदत होते म्हणून नगरपालिका दवाखाना, भाजी विक्रेत्या, व्यापारी महिलांचे स्वागत करण्यात आले.
प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वानं त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारी घेतली आहे. महिलांच्या हक्कांचं रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला त्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे असे मत शिवसेना महिला आघाडी तालुका संघटिका भुराताई चव्हाण यांनी मांडले.यावेळी
भारतीताई गोसावी. आयनूरताई शेख. लक्ष्मीताई खरे ,शोभाताई कानोजे , हिरताई पाटील .संगीतताई कोळी. बशीराबी खान, नसीम बी खान, अनिता पवार , पुष्पा खरे आदी महिलांची उपस्थिती होती.



