हद्दपार आरोपिच्या गुन्हे शोध पथक पोलीसांनी आवळल्या मुसक्या

भुसावळ (प्रतिनिधी )- हद्दपार आरोपीस कोंबीग ऑपरेशन दरम्यान गुन्हे शोध पथक पोलीसांनी रविवारी मुसक्या आवळल्या असून त्यास अटक करण्यात आली.

दिनांक 8.3.2020 रोजी 3.45 वा.सुमारास कोंबीग ऑपरेशन दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांना मिळलेल्या बातमी वरून एक वर्षे करीत हद्दपार असलेला संशयित आरोपी रायसिंग सरदारसिंग पंडित. रा.32 खोली वाल्मिक नगर भुसावळ हा स्वताः चे घरी बेकायदेशीर रित्या प्रवेश करताना मिळुन आला असल्याने त्याचे विरुद्ध भाग 6 गुरन 0084/2020 महाराष्ट्र पोलीस अधिनियम-1951कलम-142 प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आला आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले ,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत सो,सहा.पो.निरी. अनिल मोरे, संदीप परदेशी,सहायक्क फौजदार तस्लिम पठाण, पो.हे.काॅ.सुनिल जोशी,पो.ना.रविंद्र बिर्हाडे,नेव्हील बाटली,रमण सुरळकर,उमाकांत पाटील,महेश चौधरी, पो.का.विकास सातदिवे, कृष्णा देशमुख,तुषार पाटील,ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *