दिल्लीतील शाळा, रुग्णालयांना बॉम्बस्फोटाची धमकी :

नवी दिल्ली,

गळवारी दिल्लीतील अनेक रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. वृत्तानुसार, दीपचंद बंधू, दादा देव, हेडगेवार आणि जीटीबी हॉस्पिटलमध्ये बॉम्बच्या धमक्या देऊन कॉल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीही दोन रुग्णालयांना बॉम्ब हल्ल्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.

यापूर्वी 2 मे रोजी दिल्ली-एनसीआरमधील 100 हून अधिक शाळांमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली होती. ही धमकी शाळांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी शाळांमधील बॉम्बची माहिती खोटी असल्याची माहिती दिली. आरोपींनी त्यांची ओळख पटू नये, म्हणून हा मेल डार्क नेटमधून पाठवला असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली होती.

यापूर्वी लखनऊ आणि जयपूरच्या काही शाळांना मेलद्वारे बॉम्बच्या धमक्याही आल्या होत्या. मात्र, शाळांच्या तपासणीत असे काहीही आढळून आले नाही. काही दिवसांपूर्वी देशभरातील विमानतळांना बॉम्बच्या धमक्याही आल्या आहेत.

सोमवारी, 13 मे रोजी सकाळी लखनऊमधील 4 शाळांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती. त्यात विबग्योर, सेंट मेरीज, गोमतीनगरच्या पीजीआय आणि आलमबागच्या एलपीएस शाळेचा समावेश आहे. शाळा व्यवस्थापनाने तातडीने शाळांना सुट्टी जाहीर केली. मुलांना कॅम्पसबाहेर बाहेर काढून दिले. मुलांना तातडीने घरी घेऊन जा, असा संदेश पालकांना पाठवण्यात आला.सर्व शाळांची तपासणी करण्यात आल्याचे डीसीपी पूर्व यांनी सांगितले.