वरणगाव – लोकशाहीच्या निवडणुकी करता मतदान होत असताना शहरातील चार मतदान केंद्रातील एकवीस बुथवर सकाळ्याच्या सात वाजे पासूनच पावसाच्या हलक्या सरी पडल्याने वातावरणात गारवा असल्याने मतदारानी गर्दी करीत मतदान शांततेत केले तर मतदानाला वयोवृद्ध महिलाचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसला

रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारा साठी दि १३ सोमवार रोजी सकाळी सात वाजे पासून मतदानाला सुरुवात होऊन सायकाळी सहा वाजे पर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली
वातावरणात गारवा असल्याने मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्रावर मतदाराच्या मोठ्या रांगा लावल्या होत्या
यात वयोवृद्धव महिलाची संख्या मोठी होती शहरात चार मतदान केंद्रातील ऐकवीस बुधवरील २४९८५ मतदारा पैकी १५५४१ मतदारानी असे ६२ % आपला मतदानाचा हक्क बजावला यात प्रामख्याने वयोवृद्ध महिलाचा व पहिल्याच वेळी मतदान करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात होती
तर प्रशासनाने मतदाराच्या सुविधेसाठी अंपग मतदारा साठी व्हील चेअर , बाळाना साभाळंन्यासाठी आगणवाडी सेविका , तर सेवाभावी संस्थानी मतदान केंद्रा बाहेर सेल्फी पाईड लावले होते
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान , गृहरक्षक दलाचे जवानानी चोख बंदोबस्त ठेवला होता


