शिवसेनेतर्फे वीर महाराणा प्रताप जयंतीनिमित्त अभिवादन : वरणगावला प्रतीमा पूजन करून जयंती साजरी :

वरणगाव – येथे शिवसेनेतर्फे वीर योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या निवासस्थानी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे औक्षण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, तालुकाप्रमुख विकास पाटील, विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुका संघटक प्रशांत पाटील, युवा सेनेचे राहुल वंजारी, नितीन पाटील, पी.एच. बोरसे, विनीत पाटील, कुणाल महाजन आदी उपस्थित होते.