भुसावळ (प्रतिनिधी )-
जागतिक महिला दिनानिमित्त शासन आपल्या दारी योजनेंतर्गत तालुका आरोग्य कार्यालय व यावल रोड नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आज दि.६ मार्च रोजी महिला आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी करूणा डहाळे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याधिकारी करूणा डहाळे, नगरसेविका सविता (मकासरे) अहिरे, नगरसेवक राज खरात,यावल रोड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.तौसिफ खान यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या शिबीरात डाॅ.रूबीना शेख,डाॅ.गौरी खानापुरकर,डाॅ.सुमित महाजन यांनी सुमारे २०० महिलांची विविध आजारांची तपासणी व निदान केले.



