वरणगाव – शहरातील एका अल्पवयीन मुलाकडून मोबाईलच्या इस्टाग्रामवर दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोष्ट टाकल्याने शहरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र वेळीच उप विभागीय पोलीस अधिकारी व राजकिय पदाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूच्या मंडळीना शांत करीत सदर मुलावर गुन्हा दाखल करुन त्याची बाल सुधार केंद्रात रवानगी करण्यात आली

या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की शहरातील शिक्षणासाठी बाहेरगावाहून घरी परत आलेल्या अल्पवयीन मुलाने दि २१ रविवार रोजी मोबाईलच्या इंस्टाग्रामवर दोन समाजात तेढ निर्माण करून समाजाच्या भावना दुखवल्याने बहुसंख्य तरुणानी पोलीस स्टेशनच्या आवारात एकत्र त्या मुला विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केल्याने काही वेळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे पोलीस स्टेशनला हजर होऊन राजकिय व सामाजिक पदाधिकाऱ्यांना सोबत चर्चा करीत दोन्ही बाजूच्या तरुणाची समजूत काढून त्या अल्पवयीन मूलावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने वातावरण निवळले .
या बाबत अशपाक शहा फकीर याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याला बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास उप सह निरिक्षक गणेश देशमूख करीत आहे


