भुसावळ (प्रतिनिधी) –
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जळगाव जिल्हयातील भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर या
विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हा युवा अधिकारी म्हणून चंद्रकांत कैलाश शर्मा यांची नियुक्ती जाहीर केली आहे. वरील नियुक्ती तात्पुरती स्वरूपातील असून, सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येईल.
शर्मा यांच्या नियुक्ती बद्दल आमदार चंद्रकांत पाटिल , यांचेसह भुसावळ, मुक्ताईनगर व जामनेर येथील शिवसेना -युवासेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे .



