भगवान श्री महावीर स्वामी जयंती निमित्त भुुुसावळात भव्य शोभायात्रा : राजस्थानी विप्र संगठन अध्यक्ष विनोद शर्मा तर्फे शोभायात्राचे भव्य स्वागत:

भुसावळ – आज संपूर्ण देशात जैन धर्माचे २४ वें व अंतिम गुरु भगवान श्री महावीर स्वामींचे २६२३ वां जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्यात येत असुन भुुुसावळ शहरातील सकल जैन समाज बांधवाने भगवान श्री महावीर स्वामींचे जिनवाणी व गीत गात हर्षोल्हासात व उत्साहात भव्य शोभायात्रा काढण्यात आली

या शोभायात्रेचे भव्य स्वागत राजस्थानी विप्र संगठनचे अध्यक्ष विनोद शर्मा यांनी मश़्जिद चौक येथे केले सदर प्रसंगी राजस्थानी विप्र संगठन चे अध्यक्ष तथा प्रारंभिक अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार व महिला अपराध नियंत्रण संगठनेचे तालुका अध्यक्ष विनोद शर्मा , तालुका जनसंपर्क अधिकारी व पत्रका‌र अखिलेशकुमार धिमान, शहर अध्यक्ष जयप्रकाश शुक्ला, यांनी सकल जैन समाज शोभायात्रा समीती अध्यक्ष संजय कांतिलाल चोरडिया यांचे भगवान श्री महावीर स्वामींची प्रतिमा भेट देऊन व पुष्पगुघ्छ व माल्यार्पण करुन स्वागत केले तसेच शोभायात्रेत सहभागी समीतीचे विभिन्न पदाधिकारींचे स्वागत करण्यात आले, नोटरी म्हणून नियुक्त अॅड. गौरव बंब यांचे ही यावेळी स्वागत करण्यात आले तसेच शोभायात्रेत सहभागी भाविकांना प्रसाद व फराळ तसेच थंठ पाण्याची बाॅटल वाटप करण्यात येऊन विनोद शर्मा यांनी शोभायात्रेचा भव्य स्वागत केले सदर प्रसंगी दीपक शर्मा सुनील ठाकूर पंडित राम शर्मा जे बी कोटेचा डॉक्टर देवेंद्र शर्मा सत्यनारायण शर्मा कैलाश उपाध्याय सुशील गोठवाल रामू अहिरे राजू चोरवडकर नवीन शर्मा कृष्णा शर्मा कार्तिक शर्मा सिद्धेश शर्मा उपस्थित होते.