४०% दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध मतदारांसाठी होम वोटिंगची सुविधा :

,
भुसावळ विधानसभा मतदार संघातील दिव्यांग, अंध, ८५ वर्षांवरील वृध्द, अंथरुणाला खिळलेले मतदार किंवा मतदानासाठी मतदान केंद्रावर येऊ शकत नाही असे अपंग, अंध, जीर्ण आजाराने ग्रासलेले मतदार हे एकूण ११९ मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणीही मतदानापासून वंचित राहता कामा नये यासाठी वरील मतदारांच्या घरी एक टीम दोन वेळा जाऊन त्यांना मतदानाविषयी माहिती देऊन त्यांचेकडून पोस्टल मतदान बॅलेट पेपरवर मत नोंदवून घेऊन ती मतपेटी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे जमा करतील. त्यासाठी BLO, पोलीस, एक मतदान अधिकारी, झोनल, व्हिडिओग्राफर, मायक्रो ऑब्झर्व्हर यांची टीम असणार आहे. अशा एकूण १४ टीम नेमण्यात आल्या आहेत. अशी माहिती गट विकास अधिकारी पं. स. भुसावळ.यांनी दिली व सर्व फॉर्म उपलब्ध करून दिले. यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर उपस्थित होते.