प्रवाशांच्या मागणीनुसार नांदेड आणि पनवेल दरम्यान ४० अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या



उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून, मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त लक्षात घेऊन नांदेड आणि पनवेल दरम्यान ४० अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
नांदेड आणि पनवेल द्वि साप्ताहिक विशेष ( ४० फेऱ्या)
०७६२५ द्वि साप्ताहिक विशेष नांदेड येथून दि. २२.०४.२०२४ ते २६.०६.२०२४ पर्यंत दर सोमवारी आणि बुधवारी २३.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.२५ वाजता पनवेल येथे पोहोचेल. (२० फेऱ्या)
०७६२६ द्वि साप्ताहिक विशेष पनवेल येथून दि. २३.०४.२०२४ ते २७.०६.२०२४ पर्यंत दर मंगळवारी आणि गुरुवारी १४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.३० वाजता नांदेड येथे पोहोचेल. (२० फेऱ्या)
थांबे: पूर्णा, परभणी, मनवत, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नागरसोल, मनमाड, नासिक, इगतपुरी आणि कल्याण.
संरचना: १३ वातानुकूलित-तृतीय , ६ शयनयान,१ पँट्री कार आणि २ जनरेटर व्हॅन. (२२ डब्बे)
आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक ०७६२६ साठी विशेष शुल्कावर बुकिंग दि. २०.०४.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.